Nashik Crime: मयूर दातीरच्या खून प्रकरणी शुभम दातीर याला अटक

Murder
Murderesakal

Nashik Crime : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत महालक्ष्मीनगर येथे मयूर केशव दातीरच्या खून प्रकरणात वापरलेले शस्त्र व ते पुरविणारी व्यक्ती पोलिसांच्या हाती लागलेली नव्हती. पोलिसांनी गुन्ह्यातील चॉपर वाढोलीतून जप्त केले.

चॉपरचा पुरवठा करणारा संशयित शुभम दातीर यालाही शनिवारी (ता. १९) रात्री उशिरा अंबड पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात उभे केले असता, २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Shubham Datir arrested in Mayur Datirs murder case Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Murder
Crime News : धक्कादायक! पत्नीच्या वडापावमध्ये पतीने घातले उंदीर मारण्याचे औषध अन्...

मयूर दातीरच्या खुनाच्या गुन्ह्यातील म्होरक्या सराईत गुन्हेगार संशयित करण कडूस्कर याच्यासह तीन साथीदारांना पोलिसांनी बारा तासांतच बेड्या ठोकण्यात यश मिळविले होते. मयूरवर ज्या धारदार शस्त्राने वार करण्यात आले, ते शस्त्र पोलिसांना सापडले नव्हते.

मात्र सदरचे चॉपर शुभम दातीर याने पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले. अंबड पोलिसांनी शनिवारी (ता. १९) रात्री संशयित शुभम दातीर (वय २२, रा. अंबड) यास अटक केली.

शुभम याची चौकशी केली असता, करण कडूस्कर हा मयूर दातीर याचा खून करणार असल्याची माहिती १७ ऑगस्टला सकाळपासूनच शुभम याला होती, मात्र त्याने पोलिसांची दिशाभूल केली होती.

Murder
Mcoca Crime : पुण्यातील गुन्हेगारांविरुद्ध ‘मोका’चे अर्धशतक; २९७ जणांवर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com