
नाशिक : फुटपाथ हे पादचाऱ्यांना चालण्यासाठी असताना, या फुटपाथवर मात्र दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग केली जात आहे. तर काही ठिकाणी फुटपाथलगत असलेल्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करीत दुकाने थाटली आहे. यामुळे ज्यांच्यासाठी फुटपाथ उभारला. ते मात्र पुन्हा नेहमीप्रमाणेच रस्त्यावरूनच चालत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. त्यामुळे फुटपाथ नेमका कोणासाठी, पादचाऱ्यांसाठी की वाहनाच्या पार्किंगसाठी की व्यावसायिकांची सोयी व्हावी म्हणून, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे. (Sidewalks for Pedestrians or for Parking Neither ignorance of police and NMC Nashik Latest Marathi News)
शहरात त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ या मार्गांवर स्मार्ट रोड उभारला आहे. या स्मार्ट रोडच्या दुतर्फा भव्य फुटपाथ बांधला आहे. या फुटपाथमुळे पादचारी नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठांना पायी चालणे सुलभ व्हावे असा उद्देश होता. परंतु दुर्दैवाने पादचाऱ्यांना फुटपाथचा वापर करण्याऐवजी रस्त्यावरूनच चालत जावे लागते आहे. फुटपाथवर ठिकठिकाणी दुचाकी - चारचाकी वाहनांची पार्किंग केली जाते. अनधिकृत पार्किंगसह व्यावसायिकांनीही अतिक्रमण केले आहे. यामुळे पादचाऱ्यांना चालताना अडथळे निर्माण केले जात आहेत.
स्मार्ट रोडवरील जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय त अशेाक स्तंभापर्यंतच्या फुटपाथवर सर्रास दुचाकींचे पार्किंग केले जाते. तर फुटपाथलगत असलेल्या सायकल ट्रॅकवर चारचाकी चालकांनी त्यांच्या कार पार्क केल्या जातात. अनेकांनी चहाच्या टपऱ्या थाटल्या आहेत. तर, अशोक स्तंभपर्यंतच्या फुटपाथवर तर वडापाव विक्रेत्यांसह व्यावसायिक त्यांचे साहित्यांनी अतिक्रमण केले आहे. काही खासगी आस्थापनांनी फुटपाथवर अतिक्रमणच केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना या फुटपाथवरून चालणे जिकिरीची ठरते आहे.
हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!
या ठिकाणी अतिक्रमण
* त्र्यंबक नाका ते मेहेर सिग्नल * मेहेर सिग्नल ते अशोकस्तंभ * शिवाजी रोड (शालिमार) * गंगापूर रोड * कालिदास कला मंदिर रस्ता * एम.जी. रोड
व्यावसायिकांकडून अतिक्रमण
वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी दुचाकीचालक दुचाकी फुटपाथवर पार्क करतात. मात्र फुटपाथवर दुचाकी वा चारचाकी वाहने पार्क करणेही नियमांचे उल्लंघन असते. असे असताना वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई केली जात नाही. तर दुसरीकडे मनपाही फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यासाठी उदासीन आहे. त्यामुळे व्यावसायिक सर्रास फुटपाथचा वापर व्यवसायासाठी करतात. फुटपाथवरच दुकानाच्या पाट्या लावणे, मालाच्या रॅक ठेवणे, कपड्यांचे पुतळे मांडणे, चहाची टपरी थाटून टेबल-खुर्च्या मांडणे अशाप्रकारे अतिक्रमण केले जाते. मात्र त्यावर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.