Municipal Corporation
sakal
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात हजारो साधू-संत व दहा कोटी भाविक येतील, असा अंदाज बांधून त्यादृष्टीने त्यांना सोयी-सुविधा पुरविण्याचे नियोजन सुरू आहे. अर्थात, ते अद्याप कागदावर असले तरी काही कामे मात्र सुरू झाली आहेत. त्यांचे वाटप लक्षात घेता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेत लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर ‘लाडके ठेकेदार योजना’ सुरू झाली आहे. कामांच्या अटी व शर्ती निश्चित करताना आधी ठेकेदार निश्चित होतो, त्यानंतर कामांचे वाटप होते. ते का? सुज्ञास सांगणे नको.