Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ प्राधिकरणाने नाशिक महापालिकेसाठी मंजूर केलेल्या एकूण निधीपैकी बांधकाम विभागाकडील कामे स्वतंत्ररीत्या न काढता एकत्रित निविदा (क्लब टेंडरिंग) काढण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने या विरोधात राजकीय वातावरणही तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने क्लब टेंडरिंगला विरोध केला असून, शिवसेनेने नगरविकास मंत्रालयाकडे, तर ‘राष्ट्रवादी’ने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेण्याचा इशारा दिला.