Manisha Khatri
sakal
पंचवटी: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या दिंडोरी रस्त्यावरील निमाणी चौक ते महापालिका हद्द या रस्त्याच्या विकासकामांची महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी मंगळवारी (ता. २३) प्रत्यक्ष पाहणी केली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक तसेच नाशिककरांच्या सोयी-सुविधांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कुंभमेळ्याच्या काळात घाटांकडे जाणारे प्रमुख मार्ग, नियोजित वाहनतळ तसेच शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यास हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.