Ramkal Path
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात उभारण्यात येत असलेल्या रामकाल पथ प्रकल्पाची पाहणी राज्याचे पर्यटन सचिव संजय खंदारे यांनी शुक्रवारी (ता. २६) केली. यावेळी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना कामातील तांत्रिक अडचणी, स्थलांतर व पुनर्वसनाशी संबंधित प्रश्न अधिकाऱ्यांनी मांडले. या अडथळ्यांमुळे प्रकल्पासाठी मंजूर निधी खर्चास डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देणे आवश्यक असल्याची मागणी प्रशासनाने केली.