Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या सुलभ व सुरक्षित प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्यात येत आहे. भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळ चार हजार ५०० बस उपलब्ध करून देणार आहे. तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवर व्यवस्थापनासाठी सिंहस्थ प्राधिकरणाकडून संयुक्त सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.