Kumbh Mela
sakal
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेकडून अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली जाणार आहे. गेल्या वर्षी सहा हजार २०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविली होती. यंदा २०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली जाईल. एकूण सहा हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी महापालिकेला हवे आहे. पुढील वर्षात कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होईल. त्यामुळे भाविकांची रेलचेल वाढेल. फ्लोटिंग लोकसंख्या वाढणार असल्याने अतिरिक्त पाण्याची मागणी नोंदविली जाणार आहे.