Ayush Prasad
sakal
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भू-संपादन व अन्य बाबींच्या पूर्ततेला प्राधान्य देताना लोकसहभागातून सुरक्षित व उत्कृष्ट कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. कुंभमेळ्याच्या नियोजनासह जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, तसेच प्रकल्पांसाठी यंत्रणा कार्यतत्पर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.