नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व विभागांची लवकरच आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता. २४) येथे दिली. नाशिकच्या प्रश्नांसंदर्भात कुणीही बैठका घेऊ शकतात, असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले.