नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचलनालयाने ४५ कोटींचा आराखडा तयार केला आहे. नाशिक दर्शन बस, भाविकांसाठी टेंट सिटी तसेच पर्यटन माहिती केंद्रांची निर्मिती अशा विविध विकासकामांचा समावेश केला आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातून पर्यटनाच्या ४५ कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे.