Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे अधिकृत बोधचिन्ह (लोगो) तयार करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत स्पर्धकांना सहभागी होता येईल. तर ५ जानेवारी २०२६ ला अंतिम बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिकासह सन्मानित करण्यात येईल.