नाशिक- सिडकोतील अनेक नगरांतील मुख्य रस्ता खचण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामाचा नागरिकांना प्रत्यय येत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्ते नव्याने बनवले गेले तरीही त्याच्या कामकाजाबद्दल सिडको परिसरातील नागरिकांमध्ये संशयकल्लोळ दिसून येत आहे. त्रिमूर्ती चौक ते कामटवाडे लिंक रोड रस्त्यावरील भोळे शंकर चौक परिसरात रस्ता खचल्याने मोठे भगदाड पडले असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्याभोवती लोखंडी कुंपण घालून ते बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.