Sinnar Bazar Samiti : सभापती, उपसभापती पदासाठी गुरूवारी निवडणुक

Sinnar Bazar Samiti
Sinnar Bazar Samitiesakal

Sinnar Bazar Samiti : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक येत्या गुरूवारी (ता. १८) होणार आहे. बाजार समितीत दोन्ही गटांना समसमान (प्रत्येकी नऊ) जागा मिळाल्या आहेत.

त्यामुळे आता सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीचे भवितव्य दैवी चिठ्ठीवरच अवलंबून असणार आहे. (Sinnar Bazar Samiti Election for post of Chairman Deputy Chairman on Thursday nashik news)

राज्यातील महाविकास आघाडीचा एकोप्याचा धर्म बाजूला ठेवून सिन्नर बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटांमध्ये स्थानिक पातळीवर लढविली गेली.

महाविकास आघाडीचा धर्म पाळत बाजार समितीमध्ये उभय गटांनी अडीच वर्षांचा समान कालावधी वाटून घ्यायचा, की सभापती, उपसभापती निवडीसाठी ईश्‍वर चिठ्ठीचा कौल मान्य करायचा, याबाबत दोन्ही घटकांकडून खलबते सुरू आहेत.

परस्परांच्या गटांमधील एखादा जरी संचालक जाळ्यात अडकला, तरी सत्ता स्थापन करणे सुलभ होईल हे दोन्ही गट जाणून आहेत. त्यामुळे निवडणूक झाल्यापासूनच सर्व नवनिर्वाचित संचालक अंडर ऑब्झर्वेशन आहेत.

मधल्या काळात दोन्ही गटांनी आपापले संचालक सहलीला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सभापती उपसभापतीपदाच्या निवडीची तारीख ठरत नसल्याने तोपर्यंत या संचालकांना सांभाळायचे कोणी, असा प्रश्‍न उपस्थित झाला अन्‌ सहलीचा बेत फसला.

बरे एखाद्याने या सहलीच्या खर्चाची हमी घेतली, तरी त्याला फायदा काय? कारण सभापतीपदाची हमी देखील चिठ्ठीच्या कौलामुळे घेणे शक्य नाही. एकूणच सिन्नर बाजार समितीत सत्ता स्थापनेबाबत साशंकता असल्याने सभापती, उपसभापतीपदाच्या दावेदारांनादेखील देव पाण्यात ठेवण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sinnar Bazar Samiti
Nashik News : पाळीव श्वानांवरून जॉगिंग ट्रॅकवर वाद! ज्येष्ठ नागरिकांची पोलिसांत तक्रार

निवडणुक कार्यक्रम

निवडणूक निर्णय अधिकारी तथा इगतपुरीच्या सहाय्यक निबंधक अर्चना सौदाणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी बाराला सभापती, उपसभापती पदासाठी निवडणुक होणार आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात ही निवड होईल.

दुपारी बाराला अर्ज विक्री व १२.२० मिनिटांपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. १२.४५पर्यंत छाननी आणि १२.४५ ते दुपारी १ पर्यंत उमेदवारांना माघारीसाठी मुदत देण्यात येईल. आवश्यकता भासल्यास दुपारी १.१५ ते २ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे.

गाडे, डॉ. पवार आघाडीवर...

सिन्नर बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाकडून महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक शशिकांत गाडे, तर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाकडून सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार यांची नावे आघाडीवर आहेत.

या दोघांच्याही नावावर उभय गटांच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे समजते. मात्र, बहुमत नसल्यामुळे अंतिम क्षणी चिठ्ठी कोणाच्या नावाची निघेल, यावरच सत्तेची गणिते अवलंबून असणार आहेत.

Sinnar Bazar Samiti
MBA-Executive : 'एमबीए-एक्‍झिक्‍युटिव्‍ह'साठी अर्जाची या तारखेपर्यंत मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com