Crime
sakal
सिन्नर: माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंद केसरी रेटीफायर लिमिटेड कारखान्यातून कॉपर वायर चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. त्यात दोघांकडून १९७ किलो वजनाची कॉपर वायर आणि चोरीसाठी वापरलेल्या वाहनास ३ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर आठ संशयित फरार आहेत.