corrugation industry
sakal
सिन्नर: कोरुगेशन बॉक्स निर्माण करणारे १२५ कारखाने नवीन कररचनेनंतर अडचणीत सापडले आहेत. कर परतावा वेळेत मिळत नसल्याने उद्योजकांना भांडवल उभे करणे अवघड होऊन बसले आहे. कर परतावा वेळेत व निश्चित काळात परत मिळण्यासाठी सिन्नर इंडस्ट्रिअल अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (सिमा) याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना साकडे घातले आहे.