सिन्नर- विठ्ठलाच्या भक्तीतून प्रेरित होऊन लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा गजर करत असताना, सिन्नर तालुक्यातील पांगरी गावचे दिव्यांग वारकरी ज्ञानेश्वर हासे यांनी एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रवास सुरू केला आहे. व्हीलचेअरच्या साहाय्याने ते एकटेच पांगरी ते पंढरपूर हा तब्बल ३२८ किलोमीटरचा प्रवास करीत आहेत.