Municipal Election
sakal
नाशिक: पालिका निवडणुकांमध्ये १०० टक्के यश मिळविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने ‘मिशन इनकमिंग’ मोहिमेला पुन्हा वेग दिला आहे. चांदवडमध्ये माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा प्रवेश घडवून काँग्रेसला, तर इगतपुरीत माजी नगराध्यक्ष संजय इंदूलकर यांना पक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का दिल्यावर आता सिन्नरमध्येही भाजपने मोठी राजकीय चाल खेळली आहे.