Nashik Sinnar Highway
sakal
नाशिक रोड: नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे गावाजवळील टोलवेज कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात पंचक्रोशीतील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेक दिवसांपासून हा महामार्ग आणि सर्व्हिस रोड नादुरुस्त झाल्याने ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. रस्ते दुरुस्त करण्याऐवजी टोल कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.