Water Rates
sakal
सिन्नर: राज्यातील औद्योगिक ग्राहकांच्या पाणी दरात तब्बल १७.२५ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यापूर्वी १६ रुपये प्रति क्युबिक मीटर असलेला दर आता वाढवून १८.७५ रुपये करण्यात आला असून, आधीच मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या माळेगावसह इतर औद्योगिक वसाहतींतील उद्योगांना याचा मोठा फटका बसणार आहे.