Interstate Sheep Theft Gang Busted in Sinnar : सिन्नर पोलिसांनी राजस्थानातील रावल बंजारा यासह आंतरराज्य मेंढी चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावून मोठी कारवाई केली.
सिन्नर: मेंढ्या चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. राज्यस्थान येथून टोळीचा म्होरक्या गजाआड केला असून, सिन्नरसह राहाता (जि. अहिल्यानगर) येथील घटना उघडकीस आणल्या आहेत.