सिन्नर: मुंबई येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनास तालुक्यातून ५०० वाहनांतून सकल मराठा बांधव जाणार आहेत. सोबत तीन दिवसांची शिदोरी नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथील मराठा सकल समाज बांधवांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यात मुंबईला आंदोलनास जाण्याबाबतचे नियोजन करण्यात आले.