Sinnar News : सिन्नर एमआयडीसीत नवीन अग्निशमन बंब दाखल, उद्योगांना मोठा दिलासा
New Fire Fighting Vehicle for Sinnar MIDC : सिन्नर एमआयडीसीतील अग्निशमन दलात नुकतेच नवीन अत्याधुनिक अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. या वाहनामुळे औद्योगिक वसाहतीतील आगीच्या घटनांवर त्वरित नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
सिन्नर: एमआयडीसी अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवीन अत्याधुनिक अग्निशमन वाहन दाखल झाले आहे. त्यामुळे माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील दीड हजारावर उद्योगासोबत सिन्नरकरांना दिलासा मिळाला आहे. वाहनात अत्याधुनिक सुविधा आहेत.