Hemant Waje
sakal
संपत ढोली-सिन्नर: वातावरणात हुडहुडी भरली असली, तरी येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाने सिन्नरला कधी नव्हे, एवढा जोर लावल्याने नगर परिषदेची निवडणूक अधिक रंगत वाढविणारी ठरत आहे. उदय सांगळे यांच्यापाठोपाठ हेमंत वाजे यांचा प्रवेश भाजपला ताकद देणारा आहे. या घडामोडींनी एकूणच राजकीय पटलावर दोन्ही राष्ट्रवादीसमोर भाजपने तगडे आव्हान उभे केले आहे.