Crime
sakal
सिन्नर: नांदूरशिंगोटे येथे बांधकाम मजुराचा एकाच खोलीत राहणाऱ्या दुसऱ्या मजुराने खून केल्याची घटना घडली. डोक्यात लोखंडी गज मारून हा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जेवणाच्या भाजीत शाम्पूचे पाणी टाकल्याच्या कारणावरून खून झाला असून, संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.