Leopard
sakal
वडांगळी: निमगाव देवपूर येथील शिवारात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुलांचा बळी गेल्यानंतर नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी संगमनेर व इगतपुरीहून स्पेशल बिबट्या माग टीम व श्वानपथकाद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आहे. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी शेतकरी बांधवांनी खडांगळी त्रिफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनामुळे सुरत- शिर्डी महामार्गावरील वाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती.