Sanjay Dhangar
sakal
नाशिक: मुलगा व सुनेच्या नावे घेतलेल्या जमिनीच्या फेरफार उताऱ्यावर नोंद रद्द होण्यासाठीच्या सुनावणीत बाजूने निकाल देण्यासाठी दहा लाखांची मागणी करीत अडीच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या सिन्नरच्या नायब तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. मुंबई नाका परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, धनगर यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.