Sinnar Samruddhi Expressway robbery
esakal
सिन्नर : समृद्धी महामार्गावर वाहने पंक्चर करून प्रवाशांना मारहाण करीत लुटल्याची धक्कादायक घटना मलढोण शिवारात गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास घडली. अकरा ते बारा जणांच्या टोळीने एका वाहनातील प्रवाशांकडील तब्बल २७.८ तोळे सोन्याचे दागिने आणि ८४ हजार ५०० रुपये रोख असा एकूण १८ लाख नऊ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटला.