Nashik-Pune Railway
sakal
सिन्नर: नाशिक-पुणे रेल्वेमार्ग बदलण्यात आला असून, सिन्नर व संगमनेर वगळून रेल्वे शिर्डी, अहिल्यानगरमार्गे नेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे येथील उद्योजकांत संताप व्यक्त केला जात असून, सिन्नर इंडस्ट्रियल अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (सीमा) आंदोलनाचा इशारा दिला. हा रेल्वेमार्ग जुन्या सर्वेक्षणानुसार करण्याची मागणी करण्यात आली आहे.