Leopard Attack
sakal
सिन्नर: शिवडे (ता. सिन्नर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी गोरख जाधव यांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. ४) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला विहिरीकडे ओढत नेत शेतकऱ्यासह बिबट्याही विहिरीत पडला. यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवडे परिसरात तणाव पसरला होता. हा हल्ला होण्यापूर्वी या बिबट्याने तेथून जवळच ३०० मीटरवर आणखी एका शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले होते.