सिन्नर- तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली असून, या रस्त्यांवरून प्रवास करणे अतिशय धोकादायक झालेले आहे. या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेल्या मागणीकडे मात्र साफ दुर्लक्ष झालेले आहे. .त्यातच रस्ते दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांच्या प्रस्तावांना निधी उपलब्ध झाला नसल्याने पावसाळ्यापूर्वी जिल्हा, राज्यमार्गांची दुरुस्ती अशक्य दिसत आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात लोकांना प्रवास जिवावर बेतणारा ठरू शकतो इतका सध्या रस्त्यांचा दर्जा घसरलेला आहे. दरम्यान, रस्त्यांच्या या स्थितीमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे..सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तालुक्यातील जिल्हा, राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी दिलेले प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत. निधीसाठी अजून किमान एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे बांधकाम विभागाच्या कार्यालयातून सांगण्यात आले असले तरी महिनाभरानंतर कामाचे आदेश काढण्यापर्यंत लागणारा कालावधी पाहता पावसाळा येऊन ठेपणार आहे. त्यामुळे तालुकावासीयांचा प्रवास खड्ड्यांतून होणार असल्याचे चित्र आहे. .गतवर्षी तालुक्यात वीसहून अधिक रस्त्यांची उन्हाळ्यात दुरुस्ती करण्यास सुरवात झाली होती. डागडुजीची कामे काही प्रमाणात झाल्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र यंदा अजूनही निधी मिळालेला नाही. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाल्याने ग्रामीण भागातही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी घसरून महिनाभरात वेगवेगळ्या घटनांत तीन जण ठार तर दहाहून अधिक जखमी झाले आहेत. तशी नोंद सिन्नर, एमआयडीसी, वावी पोलिस ठाण्यांत झाली आहे..१५ वर्षांत एकदाही दुरुस्ती नाहीनिऱ्हाळे ते कणकोरी या मार्गाचे पंधरा वर्षापूर्वी डांबरीकरण झाले होते. त्यानंतर त्याची एकदाही दुरुस्ती झाली नाही. विंचूरदळवी ते मलढोण या मार्गाचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून दहावर्षापूर्वी काम झाले होते. त्यानंतर दुरुस्ती झालेली नाही. ग्रामीण रस्त्यांवर पंधरा वर्षानंतरही साधी डागडुजी हाती घेतली जात नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे..या रस्त्यांची अवस्था बिकट सिन्नर ते ठाणगाव, गोंदे ते डुबेरे, सोनांबे ते धोंडबार, कोनांबे ते खापराळे फाटा, वावी ते घोटेवाडी, दोडी ते मऱ्हळ, दोडी ते खंबाळे, खंबाळे ते सुरेगाव, निऱ्हाळे ते कणकोरी, निऱ्हाळे ते मऱ्हळ, ठाणगाव ते आडवाडी, सोनारी ते हरसुल फाटा, मोहदरी ते लोणारवाडी (पालखी मार्ग), सरदवाडी ते पास्ते .तालुक्यातील जिल्हा व राज्य मार्गाचे प्रस्ताव मंजुरीसाठी दिलेले आहेत. ते महिनाभरात मंजूर होऊन निधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर लगेचच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. -प्रवीण भोसले, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.