सिन्नर- सिटीलिंक बससेवेसाठी येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेला बस थांबा अवैध व्यावसायिकांनी बंद केला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. याबाबत वकील महासंघाने थांबा पूर्ववत सुरू होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सिटीलिंकच्या बस पुन्हा तहसीलसमोर पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन मिलिंद बंड यांनी महासंघाला दिले.