Manikrao Kokate
sakal
संपत ढोली- सिन्नर पूर्व भागातील सोमठाणे गट पूर्वी शहा गट म्हणून ओळखला जात होता. या गटात क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे ३३ वर्षांपासून वर्चस्व आहे. मराठाबहुल समाजाचे ग्रामस्थ येथे अधिक असून, गटात २४ गावांचा समावेश होतो. या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्री कोकाटे यांच्या कन्या सीमंतिनी कोकाटे यांच्यापुढे या वेळी त्यांचे काका भारत कोकाटे उभे ठाकले असून, त्यांनी एक प्रकारे बंधू व मंत्री कोकाटे यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले आहे.