तापमानात घसरण मात्र घामाच्या धारा कायम

sweating because of rising temperature
sweating because of rising temperatureesakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरातील तापमान (Temperature) दोन आठवड्यांनंतर प्रथमच ४३ अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. तापमानात किंचितशी घसरण झाली असली तरी हवा नसल्याने घामाच्या धारा व उकाडा कायम आहे. या हंगामात मार्चपासूनच शहरातील तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होता. सूर्यनारायणाचा प्रकोप व उन्हाच्या झळांनी मालेगावकर त्रस्त झाले आहेत. (Slight drop in temperature in Malegaon Nashik Summer News)

दुपारी रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट असतो. बाजारपेठेवर काहीसा परिणाम झाला आहे. गुरुवारी (ता. १२) ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी (ता. १३) आठवडेबाजाराचा दिवस आहे. तापमान घसरल्यास बाजारासाठी लाभदायी असेल. शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठेत या वेळी व्यापाऱ्यांनी उन्हाच्या झळांपासून बचाव व्हावा, यासाठी लोकवर्गणी करून रस्त्यांवर नेटचे आच्छादन टाकले आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

sweating because of rising temperature
RTE ची प्रक्रिया खोळंबली; पुढील प्रवेश वेळापत्रकाची प्रतीक्षा

वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे टरबूज व खरबुजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाढत्या तापमानामुळे काढणीवर आलेले टरबूज, खरबूज नरम पडल्याने खराब झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आहे त्या स्थितीत टरबूज काढून मातीमोल विक्री करावी लागत आहे.

sweating because of rising temperature
Nashik : ‘त्या‘ 36 मनसे पदाधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com