National Voters Day : जिल्ह्यातील 58 हजार मतदारांना ‘स्मार्ट कार्ड’

निवडणुकीत युवकांचे मतदान वाढावे म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने नवमतदारांना ‘एटीएम’ सारखे ‘स्मार्ट कार्ड’ वितरित केले आहे.
National Voters Day
National Voters Day esakal

National Voters Day : निवडणुकीत युवकांचे मतदान वाढावे म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने नवमतदारांना ‘एटीएम’ सारखे ‘स्मार्ट कार्ड’ वितरित केले आहे. जिल्ह्यातील ५८ हजार ३१४ युवकांना हे स्मार्ट कार्ड मिळाले असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी मंगळवारी (ता.२३) जाहीर झाली. (Smart Card to 58 thousand voters in district on national voters day nashik news)

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत चार लाख ८७ हजार मतदारांची वाढ झाली आहे. यात युवकांचा फार मोठा वाटा असून, १८ ते १९ या वयोगटातील ४६ हजार ६६४ नवमतदारांची नोंद झाली. गेल्या वर्षभरात नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना स्मार्ट कार्ड मिळाले. त्यामुळे निवडणुकीत मतदान करताना वेगळा अनुभव त्यांना येईल.

स्मार्ट कार्ड सोबत घेऊन मतदान केल्यानंतर सेल्फी काढताना वेगळाच अनुभव या युवकांना घेता येणार आहे. निवडणूक विभागाने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमात १ एप्रिल २०२४, १ जुलै २०२४ व १ ऑक्टोबर २०२४ या तारखांना वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांचे आगाऊ अर्ज भरून घेतले आहेत. १ एप्रिल रोजी सहा हजार ६७२ युवकांची नावे मतदार यादीत समाविष्ट होतील.

National Voters Day
National Voter's Day 2023: गरुडा App बनले यंत्रणेसाठी तारणहार! ऑनलाइन प्रणालीत रंगीत मतदारकार्ड

तर १ जुलै रोजी नऊ हजार ५३३ युवकांची नावे समाविष्ट केली जातील. तसेच १ ऑक्टोबर रोजी आठ हजार ४७८ युवकांची नावे मतदार यादीत समाविष्ट होणार असल्याने जिल्ह्यातील ३२ हजार ३३३ युवक येत्या वर्षभरात मतदार झालेले असतील. मतदारांची नोंदणी ही ९९ टक्के ऑनलाइन स्वरूपात झाली आहे. त्यामुळे बीएलओंवर असलेला कामाचा ताणही यानिमित्ताने कमी झाला आहे.

''जास्तीत जास्त युवकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाने (ईपीक) अर्थात स्मार्ट कार्ड दिले आहेत. एटीएम सारख्या आकाराचे हे कार्ड बाळगणे सोपे जाते. यापुढे अशाच स्वरूपाचे कार्ड दिले जाणार आहेत.''- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक विभाग)

National Voters Day
National Voters' Day : हे आहेत स्वतंत्र भारताचे पहिले मतदार! जाणून घ्या सविस्तर..

जिल्ह्यात वयोगटनिहाय मतदार

वयोगट.............मतदार

१८ ते १९....५९३१४

२० ते २९....८८८४१६

३० ते ३९....१०९७६५६

४० ते ४९....१०९६७७४

५० ते ५९....५४१३९२

६० ते ६९.....४७७९०५

७० ते ७९....२५३८६१

८० पेक्षा जास्त...१३२५३२

National Voters Day
National Voters' Day : भारताचा सर्वात खर्चिक मतदार! जाणून घ्या असं का?

आज राष्ट्रीय मतदार दिन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्त जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

National Voters Day
National Voters Day : आज साजरा केला जातोय राष्ट्रीय मतदार दिन, मतदार म्हणून काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com