Nashik : राज्यातील 1 कोटी 66 लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर

smart electricity meter
smart electricity meteresakal

नाशिक : राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेत महावितरणद्वारे एक कोटी ६६ लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर बसविण्यात येणार आहेत. (Smart electricity meter to 1 crore 66 lakh consumers in state Nashik latest marathi news)

राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली. त्यापैकी वितरण रोहित्रे आणि वीज वाहिन्यांचे स्मार्ट मिटरींग करण्यासाठी ११ हजार १०५ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

सर्व वर्गवारीतील एकूण एक कोटी ६६ लाख ग्राहकांना तसेच चार लाख ७ हजार वितरण रोहित्र तर २७ हजार ८२६ वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे या योजनेत प्रस्तावित असल्याने यात ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मिटरिंग सोबतच वाणिज्यक, औद्योगिक व शासकीय ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे, वितरण रोहित्रे आणि वाहिन्यांना संवाद-योग्य आणि अत्याधुनिक मिटरींग सुविधा प्रणालीसाठी सुसंगत मिटरिंग करण्यात येणार आहे.

मीटर नसलेल्या वाहिन्यांचे मिटरिंग आणि विद्यमान मिटर ऑनलाइन करणे आदी कामांसाठी ११ हजार १०५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यक व तांत्रिक हानी असलेल्या अमृत शहरांच्या विभागातील ३७ लाख ९५ हजार ४६६ ग्राहकांकडे हे स्मार्ट मिटर बसविण्यात येतील.

smart electricity meter
लाचखोरीच्या कारवाईने ‘आरोग्या’तील Corruption चव्हाट्यावर

वाणिज्यक व तांत्रिक हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहराच्या विभागाच्या व्यतिरिक्त इतर शहरी विभागातील २ लाख ६० हजार ४१७ ग्राहक तर ग्रामीण भागातील २६ लाख ६७ हजार ७०३ स्मार्ट मिटर बसविण्यात येतील. सर्व व्यावसायिक,औद्योगिक, शासकीय व उच्चदाब वीजवापर असलेले २६ लाख ९५ हजार ७१६ ग्राहकांकडे देखील हे स्मार्ट मिटर बसविण्यात येणार आहेत.

तसेच या विभागांमधील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची २ लाख ३० हजार ८२० वितरण रोहित्रे आणि २७ हजार ८२६ वितरण वीज वाहिन्यांवर स्मार्ट मिटर बसविण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. याशिवाय मार्च २०२५ पर्यंत वाणिज्यक व तांत्रिक हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहरातील ५५ लाख ३८ हजार ५८५ वीज ग्राहकांकडेही हे स्मार्ट मिटर बसविले जातील.

वाणिज्यक व तांत्रिक हानी २५ टक्क्यांपर्यंत असलेल्या अमृत शहराच्या विभागा व्यतिरिक्त ग्रामीण विभागातील १६ लाख ६० हजार ९४६ ग्राहकांना स्मार्ट मिटर आणि या विभागातील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची १लाख ७६ हजार ६८७ वितरण रोहीत्रांचे स्मार्ट मिटरिंग करण्यात येणार अशा एकूण १ कोटी ६६ लाख ग्राहकांना तर ४ लाख ७ हजार वितरण रोहीत्रांना आणि २७ हजार ८२६ वीज वाहिन्यांना स्मार्ट मिटर बसविणे प्रस्तावित आहे.

smart electricity meter
Nashik : तारांगण, विज्ञान केंद्र सुरू करण्याचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com