लासलगाव- कांदा सडण्याने होणारे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांसाठी कायमच डोकेदुखी ठरले आहे. मात्र, लासलगावच्या कल्याणी शिंदे या तरुण उद्योजिकेने एक अभिनव तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ‘गुदाम’ इनोव्हेशन्स या त्यांच्या स्टार्टअपद्वारे त्यांनी विकसित केलेल्या ‘स्मार्ट गुदाम’ या आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्स) आधारित प्रणालीमुळे कांदा साठवणुकीतील ३०–३५ टक्क्यांपर्यंत नासाडी कमी झाली आहे.