

NCP (Sharad Pawar) workers staged a sit-in protest at the Mahavitaran office in Satana against the installation of smart meters without consumers' consent.
Sakal
सटाणा : शहरात वीज ग्राहकांची लेखी पूर्वसंमती व योग्य पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे आज बुधवार (ता.१५) रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता रविंद्र शिरसाठ यांनी ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.