नाशिक- स्मार्ट रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच मेहेर सिग्नल आणि अशोक स्तंभ येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी सीबीएस सिग्नल येथे आता वाहनचालकांना रविवार (ता. १३)पासून उजवीकडे वळण घेता येणार आहे. शहर वाहतूक शाखेच्या या निर्णयामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.