नाशिक: त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सिन्नर या तालुक्यातील २० गावांमध्ये स्मार्टपूर प्रकल्प राबविला जात आहे. यात शिक्षण, शासकीय सेवा, वित्तीय समावेशन, उपजीविका आणि आरोग्य या पाच महत्त्वाच्या स्तंभांवर काम केले जाते. रिचा संस्था व नोकिया यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत शुक्रवारी (ता. १८) नाशिकमध्ये ‘स्मार्टपूर प्रभाव आणि अंतर्दृष्टी : वार्षिक सादरीकरण व क्षमता बांधणी’ कार्यशाळा घेण्यात आली.