Latest Marathi News | अबब! ट्रॅक्टरच्या सीटखाली निघाला साप!! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A snake under Vilas More's tractor at khamkheda

Nashik : अबब! ट्रॅक्टरच्या सीटखाली निघाला साप!!

खामखेडा (जि. नाशिक) : पावसाळ्याच्या दिवसांत सापाचा सर्वत्र वावर पाहायला मिळतो. अनेकवेळा दुचाकीत हे साप जाऊन बसतात. मात्र जेव्हा हे गाडी मालकाच्या नजरेस पडतं. तेव्हा त्याची अगदीच त्रेधातीरपीट उडून जाते. देवळा येथील तलाठ्यांना चालू दुचाकीवर सर्पदंश झाल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी (ता. १८) खामखेडा (ता. देवळा) येथे अशीच एक घटना घडली. यावेळी साप चक्क चालत्या ट्रॅक्टरच्या शिटाखाली निघाल्याची घटना घडल्याने व दुसऱ्या वाहन चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. (Snake under seat of tractor at khamkheda Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : Hit & Runच्‍या घटनांमध्ये वाढ!; दुचाकीला धडक देत वाहनचालक होताय पसार

खामखेडा येथील शेतकरी विलास बाळू मोरे ट्रॅक्टरने शेतातील सपाटी कारणासाठी जेसीबीच्या सहाय्याने माती वाहण्याचे कामा करीत होते. सकाळी आठला ट्रॅक्टरने माती वाहण्याचे सुरू केल्यानंतर दोन ते तीन ट्रीप टाकून झाल्यानंतर विलास यांचे चुलत बंधू ट्रॅक्टरकडे पाठीमागून आले असता त्यांना चालकाच्या शिटाखालून सापासारखे काहीतरी दिसले.

त्यांनी ट्रॅक्टर बंद करून जोराने आवाज देत खाली उतरायला लावले. सर्पमित्र नसल्याने इतर शेतकऱ्यांना बोलवत ट्रॅक्टर खाली उतरल्यावर पहिल्यानंतर त्यांनी चिमट्याच्या सहाय्याने साप बाहेर काढला असता नाग असल्याचे आढळले. या सापासोबतचा दोन ते तीन ट्रीप टाकून झाल्या होत्या. मात्र शिटाखाली काही भाग अडकला असल्याने या सापाला उलटून पुढच्या बाजूने जाता आले नाही.

यानंतर त्या सापाला एका डब्यात घालत जंगलात सोडण्यात आले. या संपूर्ण घटनेचा फोटो विलास मोरे व सुनिल मोरे यांनी काढले होते. नागच असल्याने दैव बलवत्तर म्हणून कुठलाही बाका प्रसंग ओढवला नसल्याचे कुटुंबाने म्हटले. हा प्रसंग सोशल मीडियांत शेअर केल्यावर अशा थरारकप्रसंगी चालक विलास मोरे, सुनील मोरे, कारभारी मोरे, दिग्विजय मोरे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

हेही वाचा: Chhagan Bhujbal | आगामी महापालिका निवडणुकांसाठी सज्ज व्हा : छगन भुजबळ यांचे आवाहन