esakal | #Lockdown : निराधार व गरजूंसाठी धावली माणुसकी! जोपासली सामाजिक बांधिलकी
sakal

बोलून बातमी शोधा

kishor bhngdiya.jpg

देशभरात सध्या लॉकडाऊन असल्याने शहरे ओस पडली असून ग्रामीण भागात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंबिय बेरोजगार झाली आहेत. किकवारी खुर्द (ता.बागलाण) येथील सात-आठ कुटुंबे रोजगारासाठी गेल्या दीड वर्षांपासून कुडीचा (जि.खरगोन, मध्यप्रदेश) येथे वास्तव्यास होती. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्याने ही सर्व कुटुंबे आता आपल्या किकवारी गावी परतली. मात्र सध्या या कुटुंबियांकडे चरितार्थासाठी इतर कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर भांगडिया यांना या कुटुंबियांबद्दल माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या सर्व कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू तसेच तसेच चिमुकल्या मुलांना खाऊचे पदार्थ देऊन मदत केली. भांगडिया यांच्या मदतीमुळे या कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले.

#Lockdown : निराधार व गरजूंसाठी धावली माणुसकी! जोपासली सामाजिक बांधिलकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सटाणा : भुकेल्यांच्या पोटात अन्नाचे दोन घास घालने, ही भावना माणसाला आनंदायी बनविते. नेमका हाच आनंद येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर भांगडिया यांनी रोजी अनुभवला. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबीयांना सामाजिक कार्यकर्ते किशोर भांगडिया यांनी जीवनावश्यक वस्तु वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. 

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या कुटुंबीयांना दिली मदत
देशभरात सध्या लॉकडाऊन असल्याने शहरे ओस पडली असून ग्रामीण भागात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंबिय बेरोजगार झाली आहेत. किकवारी खुर्द (ता.बागलाण) येथील सात-आठ कुटुंबे रोजगारासाठी गेल्या दीड वर्षांपासून कुडीचा (जि.खरगोन, मध्यप्रदेश) येथे वास्तव्यास होती. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्याने ही सर्व कुटुंबे आता आपल्या किकवारी गावी परतली. मात्र सध्या या कुटुंबियांकडे चरितार्थासाठी इतर कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर भांगडिया यांना या कुटुंबियांबद्दल माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या सर्व कुटुंबियांना गव्हाचे पीठ, चहा, साखर शेंगदाणा तेल, मसाले, तांदूळ, हळद आदि जीवनावश्यक वस्तू तसेच तसेच चिमुकल्या मुलांना खाऊचे पदार्थ देऊन मदत केली. भांगडिया यांच्या मदतीमुळे या कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले.

२४ बेरोजगार कुटुंबियांना मदत
भांगडिया यांनी शहरातील यात्रा मैदानात वास्तव्यास असलेल्या २४ बेरोजगार कुटुंबियांनाही किराणा साहित्यासह इतर जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या. तसेच नाशिक शहरात लॉकडाऊनमुळे सर्व कंपन्या बंद पडल्याने बेरोजगार झालेले युवक सध्या नाशिक येथून सटाणामार्गे नंदुरबारकडे पायी निघाले आहेत. भर उन्हातान्हात पायी निघालेल्या या युवकांना किशोर भांगडिया यांनी स्वखर्चाने जेवण मिनरल वॉटर उपलब्ध करून दिले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक राहुल गवई, आदर्श गाव किकवारी खुर्दचे प्रणेते केदाबापू काकुळते उपसरपंच दीपक काकुळते, सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाणे, उमेश सोनी, चैनसुख सोनग्रा आदि उपस्थित होते. 

पुढील आठ दिवसांचा भाजीपाला उपलब्ध करून दिला.
दरम्यान, कंधाणे (ता.बागलाण) व परिसरात गेल्या काही वर्षांपासून विहीर आणि मंदिर बांधकामाचा व्यवसाय करणारी बिहार राज्यातील पाच कुटुंबे सध्या काम नसल्याने बेरोजगार झाली आहेत. उपासमार होत असल्याने त्यांनी ईमेल द्वारे बिहार सरकारकडे व्यथा मांडल्यानंतर बिहार शासनाने महाराष्ट्र शासनास याबाबत माहिती दिली. आपल्या राज्य सचिवांनी नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांना कळविल्यानंतर त्यांनी तात्काळ बागलाणचे उपविभागीय अधिकारी विजयकुमार भांगरे आणि तहसिलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांना संर्क साधून माहिती दिली. तहसीलदारांनी श्री.भांगडिया यांना मदतीचे आवाहन करताच त्यांनी संबंधित ५ कुटुंबातील २५ सदस्यांना तात्काळ दोन्ही वेळचे जेवण, किराणा व जीवनावश्यक साहित्यासह पुढील आठ दिवसांचा भाजीपाला उपलब्ध करून दिला.

 हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

सटाणा शहर व परिसरात कोरोना विषाणूच्या भीतीमय वातावरणामुळे कुणी गरजू वयस्क, जेष्ठ नागरिक, निराधार कुटुंब अन्नधान्याशिवाय राहत असल्यास त्यांना दोन्ही वेळचा जेवणाचा डबा घरपोहच मिळेल. डबा व किरणा माल पोहचविण्याची यंत्रणा उभारली आहे. अशा गरजूंनी त्वरित संपर्क साधावा. - किशोर ओंकारमल भांगडिया, सटाणा

हेही वाचा > होम क्वारंटाईन झालेले बच्चू कडू म्हणतात.. "भावांनो हात जोडतो, घरीच थांबा" बाहेर पडू नका, 

loading image