esakal | सॉफ्टवेअर बंद, कर्मचाऱ्यांना पाठविले घरी..
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik

सॉफ्टवेअर बंद, कर्मचाऱ्यांना पाठविले घरी..

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : नगर जिल्ह्यात कोरोनाने (Corona) पुन्‍हा डोके वर काढले असताना संशयित रुग्‍णांचे स्‍वॅब चाचणीसाठी नाशिकला आणले जात आहेत. नाशिकचे (Nashik) नियमित कामकाज करताना जिल्‍हा रुग्‍णालयातील लॅबवर अतिरिक्‍त भार येतो आहे. काम वाढले असताना, ‘क्‍लाऊड पॅथॉलॉजी सॉफ्टवेअर बंद पडले आहे. तर येथे कार्यरत चार कर्मचाऱ्यांना घरी पाठविले आहे. त्‍यामुळे लॅबच्‍या कामकाजावर परिणाम होत असून, प्रलंबित अहवालांच्‍या संख्येत वाढ झालेली आहे. निधीच्‍या समस्‍येमुळे सॉफ्टवेअर व मनुष्यबळाची कपात झाल्‍याचे समजते.

कोरोना महामारीत संपूर्ण आरोग्‍य यंत्रणेवर ताण आलेला होता. या संपूर्ण प्रक्रियेत कोरोनाचे निदान करण्यासाठी रोगनिदान प्रयोगशाळा (पॅथॉलॉजी) ची भूमिका महत्त्वाची ठरली होती. जिल्‍हा रुग्‍णालयातील स्‍वॅबकरीता बारकोड आणण्यासह अन्‍य विविध माध्यमातून सुटसुटीतपणा आणण्यावर भर दिला गेला. परंतु आता संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्वभूमीवर जिल्‍हा रुग्‍णालयातील लॅब दुर्लक्षित ठरू लागली आहे. गेल्‍या १ ऑक्‍टोबरला येथील चार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले असल्‍याचे समजते. या कर्मचाऱ्यांकडून डेटा ऑपरेटिंगची प्रक्रिया राबविली जायची. इतकेच नव्‍हे तर अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेतील क्‍लाऊड पॅथॉलॉजी सॉफ्टवेअरचे काम थांबलेले आहे.

हेही वाचा: पुणे नगर हायवे वरील डिव्हायडर हटवला

अशात नगर जिल्ह्यातून दैनंदिन सुमारे दीड हजार स्‍वॅब तपासणीसाठी नमुने येत असताना व नाशिक जिल्ह्याचीही जबाबदारी कायम आहे. असे असताना कर्मचारी व सॉफ्टवेअरअभावी प्रलंबित अहवालांची संख्या वाढत चालली आहे.

हेही वाचा: 6 किल्ल्यांसाठी विकास आराखडा तातडीने तयार करावा : अमित देशमुख

रुग्‍णांना अहवाल पोहचणे झाले बंद

यापूर्वीच्‍या सॉफ्टवेअरमुळे अहवाल तयार होताच क्‍लाऊड पॅथॉलॉजी सॉफ्टवेअरच्‍या माध्यमातून कोरोनाविषयक अहवाल थेट रुग्‍णांपर्यंत पोहचविला जात होता. परंतु आता सॉफ्टवेअरच बंद पडल्‍याने संबंधित केंद्रांना स्‍वॅबच्‍या अहवालाची माहिती कळविले जात असून, त्‍यांच्‍यामार्फत रुग्‍णांपर्यंत माहिती दिली जात आहे.

loading image
go to top