श्रीलंकेत कांदा आयात बंदीची संक्रांत टळणार

solstice of onion import ban in Sri Lanka will be avoided
solstice of onion import ban in Sri Lanka will be avoidedesakal

नाशिक : श्रीलंकेतील (Sri lanka) आर्थिक आरिष्ट्यामुळे यंदा कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने कांदा आयात बंदीची संक्रांत टळण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसतात.

दुसरीकडे बांगलादेश, मलेशिया आणि सिंगापूरच्या आयातदारांनी आणखी दहा दिवस पुरेल इतका कांदा खरेदी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांद्यासाठी क्विंटलला सरासरी एक हजार रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. (solstice of onion import ban in Sri Lanka will be avoided Nashik Latest Marathi News)

उत्तर भारतामध्ये सुरु झालेला श्रावण, पावसामुळे वाहतुकीचा मंदावलेला वेग, मागणीचा अभाव या कारणास्तव उन्हाळ कांद्याला अपेक्षित भाव न मिळण्याची स्थिती मध्यंतरी तयार झाली होती. आता दक्षिणेतील कांद्याचे उत्पादन कसे राहणार? याकडे शेतकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

दक्षिणेतील कांद्याचे पावसाने वांदे केल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळाला होता. आता दक्षिणेत कांद्याचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत कमी असल्याची व्यापाऱ्यांना माहिती मिळाली आहे.

तरीही ऑगस्टऐवजी सप्टेंबरमध्ये दक्षिणेतील कांदा बाजारात येऊ शकतो, असा निर्यातदारांचा अंदाज आहे. मध्यप्रदेशमध्ये कांद्याचे ३० टक्के अतिरिक्त उत्पादन असून तेथील शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा साठवणुकीकडे कल राहिला आहे. गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांना कांद्याला किलोला किमान एक रुपया, तर सरासरी ५ ते १० रुपये मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कांद्याचा उत्पादन खर्च २२ ते २५ रुपये किलोपर्यंत पोचला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे कांद्याची आवक कशी राहणार यावर भावाचे गणित अवलंबून आहे.

solstice of onion import ban in Sri Lanka will be avoided
नाशिक : गळफास घेत 18 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

श्रीलंकेत आठवड्याला सर्वसाधारणपणे ३०० कंटेनरभर कांद्याची निर्यात केली जायची. आता १५० ते १७० कंटेनर पाठवले जातात. त्यातच पुन्हा आगाऊ पैश्‍यांच्याखेरीज निर्यातदार श्रीलंकेत कांदा पाठवण्यासाठी तयार नाहीत.

हे मुख्य कारण श्रीलंकेत मागणी असूनही निम्म्यावर निर्यात सीमित राहण्यामागील आहे. बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशमधून मोठ्याप्रमाणात कांद्याची आयात झाली होती. हा कांदा अजूनही विकला जात आहे.

मलेशिया, सिंगापूरमधील आयातदार आणखी दहा दिवस पुरेल इतका कांदा शिल्लक असल्याने खरेदीला तयार होईनात. परिणामी, आणखी दहा दिवस शेतकऱ्यांना भावासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

कांद्याच्या भावाची स्थिती

(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

० अकलूज-१ हजार

० भुसावळ-१ हजार

० चांदवड-१ हजार ५०

० दिंडोरी-१ हजार ५०

० मनमाड-१ हजार ५०

० नाशिक-१ हजार

० पिंपळगाव-१ हजार २५०

० लासलगाव-१ हजार २५१

० येवला-९२५

solstice of onion import ban in Sri Lanka will be avoided
भद्रकाली तलावडी परिसरात टवाळखोर, गावगुंडांची दहशत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com