नाशिक : समाजकंटकाडून जलतरण तलाव येथे तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Some youths in Municipal Corporation Veer Savarkar swimming pool Smashed objects in nashik

समाजकंटकाडून जलतरण तलाव येथे तोडफोड

नाशिक : येथील तिडके कॉलनी भागात असलेल्या महापालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलाव येथे काही समाजकंटकांनी साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिक : महावितरणकडून १५ लाख नवीन वीजमीटर

गुरुवारी (ता. २१) सायंकाळी ६ वाजता येथील कर्मचारी हे जलतरण तलाव बंद करण्याच्या वेळेदरम्यानच प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिकीट काउंटर वरील कर्मचाऱ्यांनी प्रवेश नाकारला असता या तरुणांनी गोंधळ घालत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. या वेळी या तरूणांनी अंघोळीच्या शॉवरसह नळाच्या पाइपची तोडफोड केली. या वेळी येथील प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांनी पोलीसांना कळविताच या तरूणांनी पळ काढला.

हेही वाचा: नाशिकच्‍या शरीरसौष्ठवपटूंनी पटकावले सुवर्णपदक

Web Title: Some Youths In Municipal Corporation Veer Savarkar Swimming Pool Smashed Objects In Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top