नाशिकच्‍या शरीरसौष्ठवपटूंनी पटकावले सुवर्णपदक | nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिकच्‍या आशिष बोबटेने आणि कृष्णा चव्हाण या शरीरसौष्ठवपटूंनी सुवर्णपदक पटकावले आहे.

नाशिकच्‍या शरीरसौष्ठवपटूंनी पटकावले सुवर्णपदक

नाशिक : पुणे येथील बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज संकुलात ‘मिस्टर युनिव्हर्स’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्‍पर्धेत नाशिकच्‍या आशिष बोबटेने आणि कृष्णा चव्हाण या शरीरसौष्ठवपटूंनी सुवर्णपदक पटकावले आहे.

ही स्‍पर्धा डॉ. संजय मोरे यांच्‍या प्रयत्‍नातून भरविली होती. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या आशिष बोबटेने सुवर्णपदक पटकावले. कृष्णा चव्हाणने मेन्स फिजिक विभागातून सुवर्णपदक जिंकले. मयूर शिंदेने कनिष्ठ गट युनिव्हर्स बॉडीबिल्डिंग स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळविला. ‘फिजिकली चॅलेंज व्हीलचेअर ’ विभागात मयूर देवरेने पाचवा क्रमांक पटकावला. मेन्स फिजिकमध्ये समाधान मिसाळने सहावा क्रमांक पटकावला. सिमरन रहाणेने महिलांच्या कनिष्ठ गट वूमेन्स फिजिक व ज्युनिअर बॉडी फीट मॉडेल या दोन्ही विभागात पाचवा क्रमांक पटकावला.

हेही वाचा: IPL चे प्लेऑफ वेळापत्रक जाहीर; कुठे असेल फायनल घ्या जाणून?

तसेच ‘भारत श्री २०२२’ या राष्ट्रीय स्पर्धेत मेन्स फिजिक विभागात गौरव ठाकरेने रौप्‍यपदक पटकावले. मेन्स फिजिक गटात कृष्णा चव्हाणने रौप्‍यपदक पटकावले. मयूर शिंदेने कनिष्ठ भारत श्री स्पर्धेत रौप्‍यपदक मिळवले. फिजिकली चॅलेंज व्हीलचेअर विभागात मयूर देवरेने तिसऱ्या क्रमांक पटकावला. चाळीस वर्षावरील मास्टर गटात आश्विन पांचाळने कास्‍यपदक पटकावले. आशिष बोपटे व सिमरन रहाणे यांनी आपापल्या गटात पाचवा क्रमांक पटकावला. सर्व पदक विजेत्‍यांना क्रीडा राज्‍यमंत्री सुनील केदारे, परिवहन मंत्री अनिल परब, इंडियन बॉडी बिल्डिंग ॲन्ड फिटनेस फेडरेशनचे डॉ. संजय मोरे, मनोहर पांचाळ, क्रीडा आयुक्त श्री.बकोरिया, राजेंद्र सातपूरकर यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविले. बिल्डिंग फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, विशाल वावरे, उपाध्यक्ष अजिंक्य वाघ, धनंजय काळे, खजिनदार किशोर सरोदे, सहसचिव सारंग नाईक, सदस्य भाऊदास सोनावणे, अॅड. नीलेश संधान, हेमंत साळवे, मिलिंद रहाणे आदींनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा: IPL SRH: काव्या मारन गदगदली, डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Web Title: Bodybuilders From Nashik Won Gold Medals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikpunesportswomen
go to top