सहकारमहर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे पतसंस्थेचा १५० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार! अंदरसूलला मुख्य कार्यालयात ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सहकारमहर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे पतसंस्थेचा १५० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार! अंदरसूलला मुख्य कार्यालयात ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Published on: 
पान-३ सेकंड मेन (नियमित, मोठी जाहिरातदार संस्था आहे... कृपया आवश्यक...) फोटो- 27526 येवला : सहकारमहर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे पतसंस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पदाधिकारी. सोनवणे पतसंस्थेचा १५० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार अंदरसूलला मुख्य कार्यालयात ४२ वा वर्धापन दिन उत्साहात सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १५ : सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता, आर्थिक शिस्त आणि सभासदांच्या सहकार्याच्या बळावर यशस्वी वाटचाल करणाऱ्या अंदरसूल येथील सहकारमहर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे पतसंस्थेचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात झाला. पतसंस्थेचा १५० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार झाला असून, संस्थेने नेहमीचे ठेवीदार, कर्जदार, सभासदांचे हित जपल्याची माहिती या वेळी देण्यात आली. प्रारंभी संस्थेचे संस्थापक स्वर्गीय सहकारमहर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तालुक्याच्या सहकार क्षेत्राला दिशा देणारे, राजकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान देणारे कणखर व शिस्तप्रिय नेतृत्व स्वर्गीय सहकारमहर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे यांनी १५ नोव्हेंबर १९८४ रोजी संस्थेचे रोपटे लावले. स्वर्गीय ॲड. सुभाषराव (आण्णा) सोनवणे यांच्या मार्गदर्शनातून व संवर्धनातून या रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेने चार दशकांहून अधिक काळ सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सध्या संस्थेचे नाशिक, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांत एकूण १३ शाखा कार्यरत असून, संस्थेचा स्वतःचा पेट्रोल पंपही आहे. संस्थेने १५० कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. संस्थेचे एकूण पाच हजार ४५८ सभासद असून, भागभांडवल चार कोटी २९ लाख रुपये आहे. तर खेळते भागभांडवल १८२ कोटी ९२ लाख रुपये इतके आहे. सभासदांना उद्योग व व्यवसायासाठी १०१ कोटीं रुपयांचे सुरक्षित कर्जवाटप करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. स्थापनेपासून संस्थेला सातत्याने ‘अ’ वर्ग मिळत असून, सभासदांना दर वर्षी लाभांशाचे वाटप केले जाते. तसेच सभासद व ग्राहकांच्या सोयीसाठी संस्थेच्या सर्व शाखांमध्ये वीजबिल भरणा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारांसोबतच ग्राहकाभिमुख सेवांनाही संस्थेने प्राधान्य दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पुंड, संचालक अमोल सोनवणे, मकरंद सोनवणे, मयूर सोनवणे, जनार्दन जानराव, राघूमामा जाधव, केशव सोनवणे, प्रकाश सोनवणे, रामनाथ एंडाईत, कचरू गवळी, अशोक एंडाईत, द्वारकानाथ सोनवणे, दत्ता थोरात, व्यवस्थापक चिंतामणी भालेराव, सुनील पुंड आदी उपस्थित होते. मुख्य व्यवस्थापक साहेबराव आहेर यांनी सूत्रसंचालन केले. मकरंद सोनवणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.