Nashik Agriculture: पेरणीचा पॅटर्नही झाला कन्फ्यूज! पावसाच्या अनियमिततेने दणका, जिल्ह्यात अवघी 61 टक्के पेरणी

Cultivation work is currently going on at full speed in the grown crop
Cultivation work is currently going on at full speed in the grown cropesakal

Nashik Agriculture : ऐन पेरणीच्या काळातच सलामीला पावसाने दडी मारल्याने कोणते पीक करावे आणि कोणते नाही..अशा समस्यांच्या गर्तेत शेतकरी अडकले होते.

त्याचा परिणाम पेरणीवरही दिसत असून कांदे लागवडीसाठी क्षेत्र सोडावे की मूग घ्यावा? मका की कपाशी? पाऊस नाही आल्यास सोयाबीनचे काय होणार? असे अनेक प्रश्न घेऊन खरिपाची कन्फ्यूज पॅटर्नची पेरणी अंतिम टप्प्याकडे सुरू आहे.

जिल्ह्यात सद्यःस्थितीत ६१ टक्के पेरणी पूर्ण झाल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते. (Sowing pattern also confused Due to irregular rainfall only 61 percent sowing in district nashik)

सुरवातीपासून लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीपाच्या पेरणीचे समीकरण बदलले असून मका व सोयाबीनच्या क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली आहे. सर्वाधिक पेरणी देवळा, मालेगाव, येवला, नांदगाव या दुष्काळी तालुक्यांमध्ये झाली.

मागील दोन आठवड्यांपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पेरणी ८१ टक्क्यांवर पोहोचली आहे. जूनमध्ये उघडीप देऊन जुलैत आलेल्या पावसाने पेरणीला वेग घेतला असला तरी जिल्ह्यात जुलैचा तिसरा आठवडा सुरू असतानाही पेरणीची शंभरी गाठलेली नाही.

कांदा लागवडीसाठी मुगाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज होता, मात्र लांबलेल्या पावसाने अवघ्या १४ हजार हेक्टरवरच मुगाचे पीक अडकले आहे. या उलट पहिल्या-दुसऱ्या पावसात मका व सोयाबीनची पेरणी झाली, पण पावसाळा लांबल्याने पुन्हा याच पिकाला पसंती मिळाली असून क्षेत्रात वाढ झाली आहे.

सध्या मकाची ८२ टक्के तर सोयाबीनची सर्वाधिक १०४ टक्के पेरणी आजपर्यंत झाली आहे. कापसाची ६७ टक्के लागवड झाली आहे.

जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार ७७२ हेक्टरवर पेरणी अपेक्षित असून मागील वर्षी आजपर्यंत ४ लाख ७९ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली होती.यावर्षी पाऊस लांबल्याने ३ लाख ८९ हजार ५७९ हेक्टरवर पेरणी झाली असून सध्या पेरणी वेगात असल्याने पुढील आठवड्यापर्यंत पेरणी उरकण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७७ हजार हेक्‍टरवर मका तर ७९ हजार ४५४ हेक्टरवर सोयाबीन व त्याखालोखाल ५२ हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे.

मागील दोन आठवड्यातील रिमझिम पावसामुळे दुष्काळी तालुक्‍यात देखील पेरणीने वेग घेतला आहे. यामुळेच येवला, मालेगाव, सटाणा, नांदगाव, निफाड, देवळा तालुक्यात ६० ते ८० टक्‍क्‍यांच्या दरम्यान पेरणीचा अंदाज आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Cultivation work is currently going on at full speed in the grown crop
Nashik Rain Update : इगतपुरीत धुवाधार पाऊस सुरू; पूर्व भागात भात लागवडीस आला वेग

भातलावगड केवळ २१ टक्के

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील भात लागवड घटली आहे.आतापर्यंत केवळ २१ टक्केच भाताची लागवड झाली आहे.तर उत्तर-पूर्व भागात जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेली मका, मूग, सोयाबीनचे पीक सद्यःस्थितीत जोमात आहेत.

जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, येवला तालुक्यात कपाशीचे तब्बल ४६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यातील ३० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. विशेषतः येवला भागात कपाशीचे क्षेत्र घटताना दिसतेय.

कांद्याची तयारी सुरू

पहिल्या पावसानंतर मुगाचे पीक घेऊन त्याच जमिनीत पोळ्याच्या दरम्यान लाल कांद्याची लागवड करण्याचे नियोजन शेतकऱ्यांचे असते. यंदा पाऊस लांबल्याने हे नियोजन कोलमडले आहे.

परिणामी अनेकांनी कांदा लागवडीचे शेत रिकामेच ठेवल्याचे दिसते. यामुळे मूगाखाली केवळ १४ हेक्टरच क्षेत्र आहे. अनेकांनी बाजरीची पेरणी केली असून पाऊस लांबल्यास बाजरीचे पीक घ्यायचे अन वेळेत पावसाने हजेरी लावल्यास बाजरीचे पीक मोडून तेथे कांदे लावण्याचे नियोजन शेतकऱ्यांचे आहे.

पावसामुळे पोळ कांदा लागवड घटेल,

मात्र रांगड्या कांद्याचे क्षेत्र वाढेल. पिके जगण्यासाठी रिमझिम पाऊस पडतोय पण चार दिवस उघडीप दिली तरी पिके धोक्यात येण्याची परिस्थिती असल्यामुळे मुसळधार पावसाची नितांत आवश्यकता आहे." -अशोक कुळधर, शेती अभ्यासक,सायगाव

Cultivation work is currently going on at full speed in the grown crop
Monsoon Train Timetable: उत्तर भारतासह राज्यात होणाऱ्या पावसाने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com