esakal | YIN अधिवेशन 2021 : युवा नेतृत्वामध्ये बदल घडवण्याची शक्ती : पोलीस अधीक्षक सचिन पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Superintendent of Police Sachin Patil

युवा नेतृत्वामध्ये बदल घडवण्याची शक्ती : पोलीस अधीक्षक सचिन पाटील

sakal_logo
By
ज्योती देवरे

नाशिक : जीवनाच्या कठीण काळात चांगली पुस्तक आयुष्यात मदत करतात. युवा नेतृत्व उद्याच्या भारताचे भविष्य असून प्रत्येक युवांमध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. स्वप्नांच वस्तुस्थितीत रुपांतर करताना कष्ट घ्यावे लागतात. कष्ट घेताना भान विसरून प्रयत्न करावे लागतात. आपल्यातील गुणांना, प्रतिभेला चालना द्या असे मत ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी यिन अधिवेशानात बोलताना मांडले. (SP Sachin Patil talk about power of youth leadership in YIN convention)

स्वतःवर विश्वास ठेवा...!

तुम्ही आज जे काही करता आहात त्यात प्रयत्न चालू ठेवा. तुम्ही ज्या गोष्टी अनुभवता त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभर वाट दाखवत असतात. अनुभवातून जे गुण आलेले असता ते लपून राहत नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आई-वडिलांनी आधार देत विश्वास दिला. आयुष्य तुमची परीक्षा घेत असते. त्यातून बाहेर आल्यानंतर स्वतः वर विश्वास ठेवा, प्रशासनात काम करत असताना अनेक लोकांच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल केले. एखादी वस्तू मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन त्यावेळी नव्हते. विषय जाणून घ्यायचा असेल तर त्या विषयाच्या प्रेमात आपण पडले पाहिजे.

हेही वाचा: YIN : 'प्रश्नांची सोडवणुकीसाठी समाजातील छोटा घटक विचारात घ्या'

पाण्यात पडला आहात तर पोहूनच बाहेर पडा!

''स्पर्धा परीक्षांची तयारी केली. दोन टर्म दिल्या पण अपयश पदरी आले होते. अपयश खूप काही शिकवून जाते. हातात आलेला घास जेव्हा हातातून जातो तेव्हा मनाची तयारी करणे कठीण होते. हे क्षेत्र जमणार नाही असे वाटले होते. नापास झाल्यानंतर नातेवाईकांचे ते शब्द बोचायचे त्यावेळी ठरवले या शब्दांच्या पायऱ्या करून वर चढलो. तिसऱ्या टर्ममध्ये चांगली रँक आली. आणि आज तुमच्या समोर आहे. पाण्यात पडला आहात तर पोहूनच बाहेर पडा.'' -सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

(SP Sachin Patil talk about power of youth leadership in YIN convention)

हेही वाचा: यंदाही गणेशोत्सवात कडक निर्बंध; 'अशी' असेल मंडळांसाठी नियमावली

loading image
go to top