Diwali Special Railway: स्पेशल, दिवाळी उत्सव रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासा! नाशिक रोड रेल्वेस्थानकात गर्दी

Nashikroad Railway Station
Nashikroad Railway Stationesakal

नाशिक रोड : विक्रमी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विक्रमी गाड्या चालवल्या आहेत. दिवाळी संपल्यानंतर घरी परतणारे प्रवासी आणि छटपूजा सणासाठी गावी जाणारे उत्तर भारतीय यांनी तुफान गर्दी केल्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रवाशांनी ओसंडून वाहत आहेत.

नाशिक रोड येथून दररोज २० हजार प्रवासी प्रवास करतात. दिवाळी व उन्हाळ्याच्या सुटीत ही संख्या ३० हजारापर्यंत वाढते. लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण चार महिन्यांपूर्वीच संपले आहे.

त्यामुळे आरक्षण कार्यालयात गर्दी कमी असली तरी नेहमीच्या तिकीट बुकिंग कार्यालयात गर्दी होत आहे. स्पेशल आणि दिवाळी उत्सव गाड्या सोडल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. (Special Diwali Utsav Railway brings relief to passengers Crowded at Nashik Road Railway Station nashik)

इगतपुरी- नाशिक रोड- अमरावती- अकोला-बडनेरा दरम्यान दिवाळीनिमित्त नागपूर, हावडा, गोंदिया, राजधानी एक्स्प्रेस अशा बारा गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावत आहेत. काही गाड्या विनाआरक्षित आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त बुकिंग खिडक्या उघडल्या आहेत. गीतांजली, काशी, भागलपूर, छपरा, गोदान, पवना, कामायनी, गोरखपूर या गाड्यांना जास्त गर्दी आहे. रेल्वेने प्रवासी, कुली तसेच स्वच्छता, पार्सल, पॅन्ट्रीकार, खानपान, ऑन-बोर्ड, हाऊसकिपिंग कर्मचारी आदींना विशेष प्रशिक्षण सुरू केले आहे.

डब्यांमध्ये आग शोधणे, दमन यंत्रणा, ज्वलनशील पदार्थांसाठी पार्सल व्हॅन आणि अन्य गाड्यांमधील डस्टबिन तपासण्यात येत आहे.

जनजागृती सभांव्दारे ७०७ प्रवासी, ३८ कुली, २८ कर्मचारी, ४० पार्सल कर्मचारी, ८२ पॅन्ट्री कार कर्मचारी, ६१ खानपान कर्मचारी, ४० कुली, ४५ ऑन- बोर्ड हाउसिंग स्टाफ, ५७ इतर आउटसोर्स कर्मचाऱ्यांना आगीची दुर्घटना टाळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

सात स्थानकांवर व्हिडिओ प्ले करण्यात आले, ४० स्थानकांवर स्टिकर्स/पोस्टर लावण्यात आले आणि १८ स्थानकांवर प्रवाशांना पत्रके वाटण्यात आली. ११४ गाड्या, ५४ स्थानके आणि ३७ यार्डांमध्ये इंधन बिंदू तपासण्यात आले.

रेल्वे प्रवाशांची अनधिकृत फेरीवाल्यांकडून फसवणूक होऊ शकते. मध्य रेल्वेतील फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अनधिकृत फेरीवाले प्रकरणी ट्रेनमध्ये २१,७४९ प्रकरणे नोंदवून २१,७३६ व्यक्तींना अटक केली. २.७२ कोटी दंड वसूल केला.

Nashikroad Railway Station
Diwali Festival Business: दिवाळीत RTOला 8 कोटींचा धनलाभ! ऑटोमोबाइल क्षेत्राला झळाळी

१७०० विशेष ट्रेन

दिवाळीत रेल्वेतर्फे नेहमीच्या ट्रेनखेरीज देशभरात १७०० उत्सव विशेष ट्रेन सुरु केल्या आहेत. त्यात मध्य रेल्वेच्या ५१५ ट्रेनचा समावेश असून ही संख्या गेल्या वर्षी २७० होती.

सणाच्या हंगामात रेल्वेने २६ लाख इतके विक्रमी बर्थ उपलब्ध केले आहेत. नेहमीच्या गाड्यांव्यतिरिक्त उत्सव विशेष ट्रेनमधून मध्य रेल्वे जवळपास साडेसात लाख अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करत आहे.

तिकीट तपासणी विक्रम

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडेय, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक रत्नाकर क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागातील ५३७ तिकीट तपासणीसांनी दिवाळीच्या ९ ते १५ नोव्हेंबर काळात भुसावळ विभागाचा तिकीट तपासणीचा नवीन विक्रम केला.

विनातिकीट प्रवासाच्या ४१,८९४ प्रकरणांतून ३ कोटी ७३ लाख दंड वसूल करण्यात आला. अधिकृत रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवासासाठी मेल एक्स्प्रेस, सुविधा ट्रेन्स, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी सुरु आहे.

Nashikroad Railway Station
Railway: दिवाळीत सुरु केलेल्या 'या' ६० गाड्यांना मिळाली मुदत वाढ; प्रवाशांना दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com